नाशिक : जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारताचे वातावरण कमालीचे थंड झाले आहे. तेथे आलेल्या शीतलहरीमुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही परिणाम मागील तीन ते चार दिवसांपासून होताना दिसून येत आहे. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून बुधवारी (दि.९) ६.९ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले.वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककरांना गारठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबरअखेरपासून थंडीचा जोर नाशिककर अनुभवत असल्यामुळे आता नागरिकांना थंडी नक ोशी वाटत आहे. सोमवारी नाशिकमध्ये राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमनाची नोंद झाली होती. तापमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली स्थिरावत असून बुधवारी पारा ६अंशापर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. बुधवारी पहाटे थंडीचा अधिकच कडाका जाणवत होता. त्यामुळे सकाळी शाळा-महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा अधिक वापर करण्यावर भर दिला. पालकांनी शालेय विद्यार्थ्यांना थंडीपासून दिलासा मिळावा यासाठी ‘उबदार’ कवच परिधान करुन शाळेत पाठविणे पसंत केले. त्यामुळे चिुमुकल्यांचे केवळ डोळेचे उघडे दिसत होते मंकी कॅप, हातमोजे, स्वेटर, जॅकेट, पायमोजे घालून बालकांनी शाळेत प्रवेश केला. तसेच सकाळी नऊ वाजता कोवळ्या सुर्यप्रकाशात बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना मैदानावर आणून धडे दिले. महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील थंडीची काळजी घेताना दिसून आले.२०१७च्या थंडीच्या हंगामाच्या तुलनेत २०१९८चा हंगाम अधिकच त्रासदायक ठरला. या हंगामात पारा प्रथमच ५.१अंशापर्यंत खाली घसरल्याचा अनुभव नाशिककरांना आला. तसेच निफाड तालुक्यातील उगावमध्ये तर शुन्य अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.साप्ताहिक किमान तापमान (अंशात)१ जानेवारी - ६.२२ जानेवारी - ७.१३ जानेवारी - ७.६४ जानेवारी- ८.५५ जानेवारी- ९.४६ जानेवारी - ९.७७ जानेवारी- ७.६८ जानेवारी- ७.३९ जानेवारी- ६.९
गारठा कायम : किमान तापमानात सातत्याने घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 4:14 PM
वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककरांना गारठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबरअखेरपासून थंडीचा जोर नाशिककर अनुभवत आहे.
ठळक मुद्दे २०१९८चा हंगाम अधिकच त्रासदायक डिसेंबरअखेरपासून थंडीचा जोर