शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्कूलव्हॅनमधून पडून चिमुरड्याचा मृत्यू

By admin | Published: February 10, 2017 1:01 AM

दुर्दैवी घटना : कोल्हे कुटुंबीयांवर आघात

नाशिक : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि़९) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील यशवंत लॉन्ससमोर घडली़ मुकुंद प्रवीण कोल्हे (स्वामी समर्थनगर, यशवंत लॉन्ससमोर, नांदूर नाका) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे़ या दुर्दैवी घटनेमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील लिटिल हर्ट्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुकुंद कोल्हे हा ज्युनियर केजीच्या वर्गात शिकत होता़ त्याच्या पालकांनी शाळेत ने-आण करण्यासाठी मॅक्सिमो (एमएच १५, इएफ ०५०२) वाहन लावलेले होते़ गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर वाहनचालक रज्जाक शेख हा मुलांना घरी सोडवत होता़ सर्व मुलांना घरी सोडल्यानंतर शेवटचा विद्यार्थी हा मुंकुद कोल्हे होता़ वाहनचालक शेख याने उर्वरित मुलांना घरी सोडल्यानंतर केवळ मुकुंदला घरी सोडणे बाकी होते़ त्यातच घर अवघ्या पाचशे मीटरवर असल्याने मुकुंद दरवाजावर येऊन उभा राहिला होता़ त्यावेळी अचानक वाहनाचा दरवाजा उघडला गेला व चालू वाहनातून मुकुंद रस्त्यावरील खडीवर पडला़ यामध्ये त्यास जबर मार लागल्याने अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी वाहनचालक रज्जाक शेख विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)