घोटी : शासन एकीकडे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना राबवित असताना तसेच शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात बालकामगारांचे कोवळे हात अनेक ठिकाणी राबत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. या बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.इगतपुरी तालुक्यात शाळाबाहेर मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, एकलव्य इंग्लिश स्कूल आणि निवासी विद्यालय यासह आदिवासी मुला-मुलींची निवासी आश्रमशाळा असताना आर्थिक विवंचनेमुळे अनेक मुला-मुलींना जवळच्या वीटभट्ट्यांवर नाइलाजास्तव राबावे लागत आहे. याबाबत शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
वीटभट्ट्यांवर राबतात चिमुकले हात!
By admin | Published: March 06, 2017 12:09 AM