दत्ता दिघोळेखडकाळ माळरानावरील जमिनीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत बी. ई. मॅकेनिकलच्या तरुणाने शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती फुलवत आर्थिक व्यवहाराची घडी बसविली आहे. सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील योगेश पांडुरंग जेजुरकर यांनी नायगाव खोयातील तरुणांना नवशेतीचा मूलमंत्रच दिला आहे. सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील गोदा-दारणेच्या संगमावर वसलेले जोगलटेंभी हे गाव. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांतून मार्गक्रमण करणे नित्याचे झाल्याने येथील शेतकरी हतबल झाला आहे. अशी परिस्थिती असताना नाशिक शहरात बालपण गेलेल्या योगेश जेजुरकर या बी.ई. मॅकेनिकल झालेल्या तरुणाने २०१४ मध्ये चाकण ( पुणे ) येथील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. जोगलटेंभी-सोनगिरी रस्त्यावरील माळरानावर शेतजमीन खरेदी करून खडकाळ जमीन माती टाकून सपाट केली. योगेशने वडील रमेश जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात मुबलक पाणी असताना पारंपरिक पिके न घेण्याचा निर्णय घेतला. जेजुरकर यांनी या माळरानावर ३० गुंठे क्षेत्रात पॉलिहाउस उभारून चायना काकडीची लागवड केली, तर दुसºया पॉलिहाउसमध्ये गुलाबाची लागवड करत ठिबक सिंचनपद्धतीचा वापर केला. गेल्या काही दिवसांपासून गुलाब व चायना काकडीपासून महिन्याला दोन ते तीन लाखांचे उत्पन्न जेजुरकर यांना मिळू लागले आहे. नोटाबंदीपासून गुलाबाचे दर कोसळल्याने नफ्यात घट येत असल्याचेही ते सांगतात. सध्या चायना काकडीला वीस किलोच्या क्रे टला ४०० ते ५०० रुपये असा भाव मिळत असल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. हे काकडी पीक अजून दोन महिने भरघोस उत्पादन देईल, असा विश्वास योगेश यांना वाटतो. नायगाव खोºयात प्रथमच न्चायना काकडीचे पीक घेतले आहे. यशस्वी व वेगळे उत्पादन बघण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी जेजुरकर यांच्या शेतावर भेट देण्यासाठी येऊन माहिती जाणून घेत आहे.
खडकाळ माळरानावर चायना काकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:27 AM
खडकाळ माळरानावरील जमिनीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत बी. ई. मॅकेनिकलच्या तरुणाने शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती फुलवत आर्थिक व्यवहाराची घडी बसविली आहे. सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील योगेश पांडुरंग जेजुरकर यांनी नायगाव खोयातील तरुणांना नवशेतीचा मूलमंत्रच दिला आहे.
ठळक मुद्दे शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती चायना काकडीला वीस किलोच्या क्रे टला ४०० ते ५०० रुपये भाव खडकाळ जमीन माती टाकून सपाट केली.