लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतात चिनी सायबर हल्ले केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडूनदेखील सतर्कतेचा इशारा नुकताच देण्यात आला आहे. यानंतर देशभरातील बॅँकिंग क्षेत्र ‘फिशिंग’ या प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून सावध होत आपल्या ग्राहकांनाही सावध राहण्याचे आवाहन करत आहेत.कोरोना विषाणूच्या संक्रमणाने देश हादरला असून, जनसामान्यांच्या मनात कोरोनाविषयीची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पूर्व लडाखच्या भारत-चीनच्या गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरसुद्धा तणावाचे वातावरण चीनच्या कुरघोडीमुळे निर्माण झाले. त्यामुळे चीनने आता भारतातील नागरिकांच्या मनात असलेल्या कोरोना आजाराच्या भीतीचा गैरफायदा घेत ‘फ्री कोविड टेस्ट’च्या नावाखाली सरकारच्या नावाखाली बनावट ई-मेल पाठवून ‘फिशिंग’प्रकारचा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून वर्तविली गेली. यानंतर भारतातील बॅँकिंग क्षेत्राकडूनही ग्राहकांना सावध करणारा इशारा ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. चिनी हॅकर्सकडून बनावट ई-मेल पाठवून त्या ई-मेलमध्ये ‘फ्री कोविड टेस्ट’चे आमीष दाखवून एका लिंकद्वारे आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी माहितीवर डल्ला मारण्याचाही प्रयत्न चिनी हॅकर्सकडून चालविला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चिनी सायबर हल्ला म्हणजे नेमके काय?चीनकडून संभाव्य सायबर हल्ला शासकीय नावाने बनावट ई-मेल पाठवून सायबर गुन्हेगारांकडून केला जाण्याची शक्यता आहे. या ई-मेलमध्ये वेगवेगळे प्रलोभनेदेखील दाखविले जाऊ शकतात किंवा कोविडबाबतचा औषधोपचार किंवा एखाद्या ई-मेलमध्ये वैयक्तिक कागदपत्रे किंवा बॅँक खात्याची मागणीही केलेली असू शकते. बनावट ई-मेलचा वापर करून हॅकर्स क्रिमिनलद्वारे ‘फिशिंग अॅटेक’ केला जातो. यामुळे नागरिकांनी अशा बनावट ई-मेलपासून सावध रहावे. सरकारच्या नावाने आलेल्या ई-मेलला प्रतिसाद देऊ नये, असे म्हटले आहे.चिनी सायबर हल्ल्याचा धोका सर्वाधिक बनावट ई-मेलद्वारे भारतीयांना पोहोचविला जाऊ शकतो. बनावट ई-मेलमध्ये कुठलीही प्रलोभने किंवा कोरोनासंदर्भातील औषधोपचाराची माहिती, डब्ल्यूएचओच्या नावाने काही कागदपत्रांची फोटो, बनावट व्हिडिओ आदी प्रकारे आकर्षित केले जाऊ शकते. फसव्या ई-मेलमधील लिंकवर क्लिक करू नये, तर तत्काळ डिलिट करावे. नागरिकांनी सायबर सुरक्षाविषयी जागरूक राहून चीनचा हा प्रयत्न हाणून पाडावा.- तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ
बनावट ई-मेलद्वारे चिनी सायबर हल्ल्याचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:09 PM
नाशिक : भारतात चिनी सायबर हल्ले केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडूनदेखील सतर्कतेचा इशारा नुकताच देण्यात आला आहे. यानंतर देशभरातील बॅँकिंग क्षेत्र ‘फिशिंग’ या प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून सावध होत आपल्या ग्राहकांनाही सावध राहण्याचे आवाहन करत आहेत.
ठळक मुद्दे‘फ्री कोविड टेस्ट’चे आमिष : ‘सीईआरटी’कडून इशारा; बॅँकांकडून खबरदारी