नाशिक : जिल्हा म्हणजे भारताचे किचन असून, नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रॉनिक हबमधील उद्योगांमध्ये गुंतणूक करण्यास चिनी उद्योजक उत्सुक असल्याचे प्रतिपादन चीनचे वाणिज्यदूत तांग गुओकाई यांनी केले आहे.नाशिकमधील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि.३०) महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड एसएमई परिषदेमध्ये चीनसोबत असलेले नाशिकचे औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याविषयी विविध विषयांवर चर्चा क रण्यात आली. यावेळी तांग गुओकाई यांनी नाशिकमधील उद्योगात गुंतवणुकी विषयी चीन उद्योजकांची उत्सुकता प्रदर्शित केल्याने परिषदेच्या आयोजकांनी तत्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सल्ल्याने नाशिकचे महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त यांच्यासह विभागीय आयुक्तराजाराम माने यांच्यासोबत तांग गुओकाई यांची भेट घालून देत त्यांना नाशिक शहर व जिल्ह्याच्या भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक रचनेविषयी अधिक माहिती दिली.या परिषदेसाठी एसएमई अध्यक्ष चंद्रकांत साळवे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. यासर्वप्रतिनिधी मंडळाला तांग गुओकाई यांनी चीन भेटीचे निमंत्रण देत दोन्ही देशांमध्ये उद्योग व व्यापारासोबत सांस्कृतिक देवाण-घेवाणही वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटींदरम्यान वारंवार चर्चेला आलेल्या गोदावरी नदी आणि तिच्या प्रदूषणाविषयी बोलताना तांग गुओकाई यांनी गोदावरीच्या प्रदूषण निर्मूलनासाठीही सहभाग नोंदविण्याची तयारी दाखविल्याची माहिती महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड एसएमई परिषदेचे समन्वयक अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली.
नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी चिनी उद्योजक उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:38 AM