नाशिक : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या डोकलाम सीमावादामुळे देशभरात विविध चिनी वस्तुंचा विरोध होत असतानाही यावर्षी गणपती व महालक्ष्मींच्या देखाव्यांसाठी यंदा अनेक गणेशभक्तांनी बाजारपेठेत चीनमधून आलेल्या शोभिवंत प्लॅस्टिक आणि लायटिंगची खरेदी केली. एककीडे गणेश उत्सवाचे महत्त्व लक्षात घेता अनेक शोभेच्या व देखाव्यांच्या चिनी वस्तू बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असताना दुसरीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीही सुरू होती. परंतु, चिनी प्लॅस्टिकची फुले व लायटिंग देशी बनावटीच्या साहित्यपेक्षा स्वस्त असल्याने अनेक गणेशमंडळांनी व गणेश भक्तांनी अशाच सजावट साहित्याला पसंती दिल्याचे दिसून आले. चीनमधून आलेली ही फुले नैसर्गिक फुलांप्रमाणे हुबेहूब दिसत असल्याने असली व नकली फुलं ओळखणे अवघड आहे. विविध रंगांतील प्लॅस्टिक फुलं, गुच्छ, प्लॅस्टिकचे हार, लड, फुलदाणी, फ्लॉवर बॉल, पाण्यात ठेवण्यासाठी फुले, काचेच्या वेली, फुलांच्या वेली, पूजेची फळे आदी सुमारे अडीच हजार प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे गेल्या आठवडाभरात चिनी फुलांमुळे बाजारपेठ जणू फुलशेतीत रूपांतरित झाल्याचा भास होत होता. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांत या साहित्याला मागणी वाढली असून, ठिकठिकाणच्या गणेश मंडळांनी आरास सजावटीसाठी या फुलांचा वापर केलेला आहे. गणेशोत्सवाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता फक्त सजावटीची उलाढाल जवळपास दोन ते अडीट कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे व्यावसायिक ांनीही या उत्सवाला विशेष महत्त्व दिल्याचे दिसून आले. दरम्यान, चिनी वस्तुंना मागणी असली तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा ट्रेंड वाढू लागल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.पुनर्वापर शक्यएकदा आराशीसाठी केलेला खर्च दुसºया वर्षी उपयोगी येईलच असे नाही. परंतु, सजावटीसाठी वापरण्यात येणारे चिनी प्लॅस्टिकची फुले व माळा वॉशेबल असल्याने वर्षानुवर्षे सजावटीसाठी उपयोगी पडणाºया असल्याने त्यांना ग्राहकांनी पसती दिली. प्लॅस्टिक फुलांच्या माळांमध्ये शंभर ते दीडशे प्रकार असून, मोगरा, जास्वंद, गुलाब, झेंडू, जुई आदी फुलांच्या प्रकारांचा यात समावेश आहे. त्याची किंमत पन्नास रुपयांपासून दीडशे, दोनशे ते हजारो रु पयांपर्यंत आहे. फुलांचा गुच्छ आठ ते दहा रंगांत असून, त्याची किंमत ५० ते ६० रुपयांपासून सुरू होते.
गणेशोत्सवात सजावटीसाठी चिनी साहित्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:27 AM