नाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याबद्दल जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या तालुक्यात सर्व्हरचा वा रेंजचा प्रश्न येत असेल त्याठिकाणी आॅफलाइन काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक तालुक्यात सव्वादोन लाख खातेदारांची संख्या असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठ्यांकडून काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले, तर अन्य तालुक्यांत सर्व्हर डाउनमुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काम मंदगतीने होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. चोक्कलिंगम यांनी ज्या चार तालुक्यांत कामाची मंदगती आहे अशा तालुक्यांमध्ये जलदगतीने कामे करण्याची सूचना केली तसेच सर्व्हर डाउनबद्दल यापूर्वीही नाशिक जिल्ह्णातून तक्रार करण्यात आल्याचे पाहून ज्या ज्या ठिकाणी सर्व्हरचा प्रश्न निर्माण होईल तेथे आॅफलाइन काम करण्यात यावे, असे सूचित केले. मार्च महिन्यापर्यंत सातबारा संगणकीयकरणाचे काम पूर्ण करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून त्याचे वाटप सुरू करण्यात यावे, असेही चोक्कलिंगम म्हणाले. सध्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होऊन रिइडीटचे काम केले जात आहे. रिइडीटमध्ये संगणकीय सातबारा उताºयात निदर्शनास आलेल्या चुका दुरुस्त केल्या जातात. नाशिक तालुक्यात सर्वाधिक खातेदार असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी दररोज आठ तास एकाच ठिकाणी बसून सातबारा संगणकीयकरणाचे काम करीत असून, सर्व्हरचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आॅफलाइन काम केले जात आहे. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सातबारा संगणकीकरणाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यातील ११ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणातील चुका दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात संगणकीय सातबारा उतारा वाटपही केले जात आहे. परंतु मालेगाव, नाशिक, नांदगाव, निफाड या चारही तालुक्यांत मात्र जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले.
चोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:20 AM
नाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठळक मुद्देआॅफलाइन काम करण्याचा सल्लासर्व्हरचा प्रश्न निर्माण