याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुने नाशिक परिसरात द्वारका व बागवानपुरा या परिसरांच्या मध्यभागी असलेल्या महात्मा फुले पुतळ्याजवळ असलेल्या पोलीस चौकीला लागून महालक्ष्मी चाळ ही वसाहत आहे. या वसाहतीत कामगार वर्ग वास्तव्यास आहे. सोमवारी मध्यरात्री अचानकपणे दोन गट आपआपसांत भिडले. ‘तू मेरी पुलीस को टीप क्यू देता हैं’ असा जाब विचारत संशयित विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी आकाश व करण लोट यांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित बेनवालसह सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरीष पवार, मनीष दुलगज, शिवम पवार आदींनी येऊन शिवीगाळ करत धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यावेळी रंजवे यास वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर करण हा गंभीर जखमी झाला. महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री उडाल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दंगलखोरांपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या दंगलखोरांवर हत्या, प्राणघातक हल्ला व दंगल माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दंगलीमध्ये सुमारे दहा ते बारा संशयितांचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. फरार समाजकंटकांचा पोलीस शोध घेत आहेत.
---इन्फो--
पुर्ववैमनस्यातून तडीपार गुंडाकडून हत्या
महालक्ष्मी चाळीत राहणाऱ्या रंजवे याची पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराकडून हत्या करण्यात आली आहे. संशयित आरोपी विशाल बेनवाल यास पोलीस उपायुक्तांनी शहरासह जिल्ह्यातून तडीपार केले आहे; मात्र तो केवळ कागदावरच तडीपार असून सर्रासपणे जुने नाशिक भागात वावरत होता. बेनवाल याने कुरापत काढत रंजवेवर हल्ला चढवून ठार मारल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.
--इन्फो--
भद्रकाली पोलीस ठाण्यात गर्दी
मृत रंजवे व करणला गंभीर जखमी करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.९) दुपारी बारा वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्यात नातेवाइकांसह मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. यावेळी महिलांची संख्या अधिक होती. सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी संतप्त जमावासोबत संवाद साधून सहा दंगलखोरांना तत्काळ अटक करण्यात आली असून गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेत त्यानुसार विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार संशयितांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनीही जमलेल्या नागरिकांची समजूत काढून कायदा हातात कोणीही घेऊ नये, अन्यथा गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
--
फोटो आर वर ०९पोलीस व ०९आकाश रंजवे मर्डर नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
090221\09nsk_2_09022021_13.jpg
===Caption===
भद्रकाली पोलीस ठाण्यात जमलेली गर्दी