नाशिक : नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील चोपडा, कार्याध्यक्षपदी संदीप काकड तर सरचिटणीसपदी शंकरराव पिंगळे यांची निवड झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटी व कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. कार्यकारिणीमध्ये सुभाष क्षीरसागर (उपाध्यक्ष), समाधान जेजूरकर (सहचिटणीस), भाऊसाहेब निमसे (खजिनदार) यांच्यासह अनिल सोमवंशी, योगेश खैरनार, विक्रांत मते, जितेंद्र राका, सचिन भोर, देवदत्त जोशी, इरफान शेख, प्रसाद पोरजे, सुरेंद्र कोठावळे यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब मगा, उद्धव निमसे, बाळासाहेब तांबे, कुलविंदरसिंग बग्गा उपस्थित होते.
मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशन अध्यक्षपदी चोपडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 01:02 IST