नाशिक : इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकीय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते. १९१० सालापासून ते मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार होते; मात्र २१ डिसेंबर १९०९ साली जॅक्सन यांची युवा क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजयानंद’ सिनेमागृहात गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांची कबर नाशिकच्या ख्रिस्ती कब्रस्तानात आजही पहावयास मिळते.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्याविरुद्धचा खटला आणि त्यांच्या अटकेबाबत जॅक्सन यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. बाबाराव यांच्यावर राष्टÑविरोधी घोषणाबाजीचा खटला त्यावेळी भरण्यात आला होता. त्यामुळे जॅक्सन यांच्या हत्येचा कट शिजविला गेला होता आणि १९१० साली पहिल्या महिन्यात जॅक्सन यांची हत्या करण्याचा निर्णय त्यावेळी क्रांतिकारकांनी केला होता. तत्पूर्वी विजयानंदमधील निरोप समारंभाच्या निमित्ताने आलेल्या जॅक्सन यांची कान्हेरे यांनी हत्या केली.यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दफन नाशिकच्या सारडा सर्कल परिसरातील ख्रिस्ती कब्रस्तानमध्ये करण्यात आले. त्यांची कबर आजही या कब्रस्तानात पहावयास मिळते. सदर कबरीवर जॅक्सन यांचे पूर्ण नाव, जन्म व मृत्यूचा दिनांक, मृत्यूचे कारण भारतीय शासकीय सेवेतील पद आदी माहिती इंग्रजी भाषेतून वाचवयास मिळते. या क ब्रस्तानमध्ये अन्य इंग्रज अधिकाºयांच्याही कबरी पहावयास मिळतात. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक उपवनसंरक्षक, सैन्यदलातील अधिकारी अशा विविध इंग्रज राजवटीमध्ये मयत झालेल्या अधिकाºयांच्या पुरातन कबरी येथे आहेत. एकूणच सदर कब्रस्तानदेखील ब्रिटिश राजवटीचे साक्षीदार आहेत.‘विजयानंद’ आहे ‘त्या’ घटनेचा साक्षीदार‘विजयानंद’ हे सिंगल पडदा सिनेमागृह आहे. या सिनेमागृहाला मोठा इतिहास लाभलेला असून, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी या सिनेमागृहाचा वापर केला आहे. विजयानंद सिनेमागृह मूळ नाशिक अर्थात जुने नाशिकमधील भद्रकाली परिसरात आहे. आजही या सिनेमागृहात चित्रपटांचे शो होतात. चित्रपटसृष्टीचा जन्म आणि इंग्रज राजवटीमधील जॅक्सन हत्येचा साक्षीदार विजयानंद सिनेमागृह आहे. जॅक्सन यांच्या निरोप समारंभानिमित्त ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग विजयानंदमध्ये झाला. याचवेळी क्रांतिवीर हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली.
ख्रिस्ती कब्रस्तान : तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी जॅक्सन यांची कबर देते उजाळा १०८ वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:58 AM
नाशिक : इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकीय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते.
ठळक मुद्देसिनेमागृहात गोळ्या झाडून हत्या कब्रस्तान ब्रिटिश राजवटीचे साक्षीदार