पप्पु वाढवणे वडनेरभैरवचांदवडला नगरपरिषद अस्तिवात आल्याने तालुक्यातील एक गट कमी होऊन अन्य जिल्हा परिषद गटाची पुर्नरर्चनेत गावाची संख्या वाढली आहे. वडनेरभैरव गट महिला आरक्षित झाल्याने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. वडनेरभैरव गणात चुरशीची लढत होणार कारण सभापती आरक्षणामुळे वडनेरभैरव गणाची चलती होत आहे. त्यामुळे या गणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आगामी पंचायत समितीचा सभापती या गणाचा होऊ शकतो तसा या वडनेरभैरव व धोंडबे गणाला चांगला इतिहास आहे. सन २००७ च्या निवडणुकीत या गटातील धोंडबे गणाचे सदस्य अरविंद रकिबे हे अपक्ष निवडून आले असताना त्यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली होती. नंतर त्यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर वडनेरभैरव गणाचे सदस्य दिलीपराव धारराव हे उपसभापती झाले होते. असा या गणाचा इतिहास आहे़चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव गट हा दोन पंचवार्षिक कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे . त्यामुळे आता शिवसेना व भाजपाने वडनेरभैरव गट आपल्याकडे घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.त्यात गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. या गटात महिला राखीव सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर येऊन पोहचली आहे. गेल्या निवडणुकीत या गटावर राष्ट्रवादीचे निविर्वाद वर्चस्व राहिले आहे; पण आता राष्ट्रवादीबरोबर भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस, मनसे आदि पक्षांनी कंबर कसली आहे. वडनेर भैरव गण सर्व साधारण पुरु ष असल्याने व चांदवड पंचायत समितीचे आरक्षण सर्व साधारण पुरुष असल्याने या गणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. चांदवड तालुक्याच्या राजकारणात नेहमीच वडनेरभैरव गटाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे . सन २००७ च्या निवडणुकीत या गटातून कॉँग्रेसचे संपतराव वक्ते हे निवडून आले होते, तर २०१२ ची निवडणुक अटी-तटीची झाली होती. कॉँग्रेसचे नेते संपतराव वक्ते यांच्या पत्नी शोभा वक्ते व राष्ट्रवादीकडून माजी आमदार उत्तम बाबा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ज्योती बाळासाहेब माळी या निवडून आल्या होत्या. त्यांची जिल्हा परिषदेत अडीच वर्ष शिक्षण व आरोग्य सभापतिपदी निवड झाली होती. वडनेरभैरव गटात नेहमीच कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होत आहे.
सभापती आरक्षणामुळे गणात चुरस
By admin | Published: January 16, 2017 12:53 AM