सिडको : दरवर्षी पावसाळ्यात सिडको भागातील बहुतांशी नागरिकांच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरून घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आलेले असतानाही महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने यंदाही याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मनपा प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याबाबत ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.दरवर्षी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने पावसाळा सुरू होण्याआधी सिडको तसेच अंबड भागातील नैसर्गिक पावसाळी नाले तसेच गटारी साफ करण्याची मोहीम राबविण्यात येते. यंदाच्या वर्षी वरवर ही मोहीम राबविली असली तरी पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात जात असल्याबाबत अद्यापही कोणतीही उपाययोजना केली नसल्याने यंदाच्या वर्षीही ज्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते अशा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे दिसते. सिडको तसेच अंबड भागात मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान होत असल्याने याबाबत मनपा प्रशासनाने पावसाळा सुुरू होण्याआधीच उपाययोजना करणे गरजेचे असतानाही त्याबाबत दक्षता घेतली गेली नाही. मनपा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हा नागरिकांच्या जिवावर बेतला जात असून, मनपाने तत्काळ दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात सिडकोतील गणेश चौक, एन ८ सेक्टर, बाजीप्रभू चौक, पेलिकन पार्कच्या पाठीमागील भाग, उपेंद्रनगर, शांतीनगर, शाहूनगर यांसह परिसरातील नागरिकांच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरत असून, यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान होते.वृत्तपत्रविक्रेत्यांचे हालसिडकोतील गणेश चौकात पहाटेच्या सुमारास संपूर्ण सिडको व अंबड भागासह परिसरात नागरिकांना वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करणारे विक्रेते याठिकाणी असतात.याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने याचा त्रास वृत्तपत्र विक्रेत्यांना सहन करावा लागतो.विशेष म्हणजे याच ठिकाणी भाजपाच्या विद्यमान महिला नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असतानाही त्यांच्याकडूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेचा सिडको विभाग ढिम्मच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:35 AM