नाशिक : विनापरवाना तसेच सुरक्षिततेचे कोणतेही उपाययोजना न करता रस्त्यावर फटाके विक्री करणाºया सिडकोतील सहा फटाके विक्रेत्यांवर अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पोलिसांनी या दुकानदारांकडून १७ हजार ५३५ रुपये किमतीचा फटाक्यांचा साठाही जप्त केला आहे़ पोलिसांनी सिडकोतील माणिकनगर भाजी मार्केट रोडवर विनापरवाना फटाक्यांची विक्री करणारा संशयित खुशल शांताराम जाधव (२०, रा़ उपेंद्रनगर, सिडको) याच्याकडून २ हजार ५२० रुपयांचे फटाके, पिरबाबा चौकात फटाके विक्री करणारे निंबाजी तुकाराम आव्हाड (५३) यांच्याकडून २ हजार ४४३ रुपयांचे फटाके, कारगिल चौकात फटाके विक्री करणारे धीरज गौतम सिंग (२५) यांच्याकडून ३ हजार ४५६ रुपयांचे फटाके, चिंचोळे शिवारातील म्हाडा कॉलनीत फटाके विक्री करणारे कैलास राजेंद्र झोडगे (२१) याच्याकडून २ हजार २४६ रुपयांचे फटाके, राणा प्रताप चौकात फटाके विक्र ी करणारे मुकुंद रामभाऊ कदम (३६) याच्याकडून दोन हजार ५९० रुपयांचे फटाके तर शिव चौकातील दत्तनगरमध्ये फटाके विक्री करणाºया अर्जुन दादा शिंदे याच्याकडून चार हजार २८० रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत़ अंबड पोलिसांनी विनापरवाना फटाके विक्री करणाºया या सहा संशयितांबरोबरच मोरवाडी व त्रिमूर्ती चौकातील आणखी दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत़ (प्रतिनिधी)
सिडकोतील विनापरवाना फटाके विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
By admin | Published: October 30, 2016 12:20 AM