सिडको : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीने पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास सिडकोतील पंडितनगर येथे घडली. घटनेनंतर संशयित सारिपुत्र पुंजाराम शिंदे फरार झाला असून या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील पंडितनगर भागात सारिपुत्र पुंजाराम शिंदे (२५) व रमा सारिपुत्र शिंदे (२१) हे पती-पत्नी दोन महिन्यांपूर्वीच पंडितनगर येथे राहण्यासाठी आले होते. घरात सारिपुत्र याचे आई, वडील व भाऊदेखील राहात होते. सारिपुत्र हा निखाडे, ता. परभणी येथील रहिवासी असून, नाशिकमध्ये तो बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. एक वर्षापूर्वीच त्याचा विवाह झालेला होता. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले व त्यात रागाच्या भरात सारिपुत्र याने घरातील भाजी कापण्याच्या सुरीने रमाच्या गळ्यावर व पोटावर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत रमाचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर संशयित सारिपुत्र शिंदे हा फरार झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित शिंदेच्या शोधासाठी नियोजन केले असून, फरार शिंदे लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये सारिपुत्र शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीचा खून सिडकोतील घटना : घटनेनंतर पतीचे पलायन; खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 1:50 AM
सिडको : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीने पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास सिडकोतील पंडितनगर येथे घडली.
ठळक मुद्देघटनेनंतर संशयित सारिपुत्र पुंजाराम शिंदे फरार अंबड पोलीस ठाण्यामध्ये सारिपुत्र शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा