सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कामावर येताना कधीही वेळेवर येत नसून दुपारी जेवणाच्या सुटीच्या वेळात तर तब्बल दोन तासांनी कामावर हजर होतात. तसेच कामावरून घरी जाताना वेळेअगोदरच निघूनजातात. याबाबत आज ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांनी कर्मचाºयांची झाडाझडती घेतली. तसेच यापुढील काळात कामचुकारपणा करणाºया कर्मचाºयांची गय केली जाणार नसल्याचा सज्जड दमही सभापतींनी दिला.महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील कर्मचाºयांच्या अनागोंदी कारभाराबाबत सभापती सुदाम डेमसे यांनी विभागीय अधिकाºयांसह कर्मचाºयांना त्यांच्या दालनात बोलावून जाब विचारला. कार्यालयीन वेळेत स्वत:चे इतर घरघुती काम करण्याबाबत कर्मचारी व अधिकारी यांना तंबी दिली, तसेच यापुढील काळात कार्यालयीन वेळेवर कामावर हजर व्हावे, तसेच कामकाजासाठी कार्यालयीन वेळेत बाहेर जाताना व बाहेरहून कामावर येताना मुव्हमेंट रजिस्टरवर नोंद करावी. याबरोबरच कामचुकारपणा करणाºया अधिकारी व कर्मचाºयांची यापुढील काळात गय केली जाणार नसल्याचेही यावेळी सभापतींनी खडसावून सांगितले. यावेळी कर्मचाºयांनी झालेली चूक कबूल करून यापुढील काळात कामकाजात सुधारणा करणार असल्याचे सभापतींना सांगितले. यावेळी शहर सुधार समितीसभापती भगवान दोंदे, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत आदी उपस्थित होते. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत ‘लोकमत’मध्ये (दि.५) वृत्त प्रसिद्ध झाल्याने मंगळवारी बहुतांशी सर्वच अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत हजर झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. विशेष म्हणचे दुपारी जेवणाच्या सुटीनंतर दोन तास टाईमपास करणारे कर्मचारीदेखील वेळेत कामकाज करताना दिसून आल्याने कामकाजासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आज लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सर्व अधिकारी व कर्मचारी हे ओळखपत्रासह कामावर हजर झालेले दिसले.
सिडको मनपा कार्यालय : आज खातेप्रमुखांची बैठकसभापतींनी घेतली कर्मचाºयांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:12 AM
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसून जेवणाच्या सुटीच्या वेळात तर दोन तासांनी कामावर हजर होतात.
ठळक मुद्देकर्मचाºयांच्या अनागोंदी कारभारमुव्हमेंट रजिस्टरवर नोंद करावी