शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

अतिक्रमण निर्मूलनासाठी सिडको सज्ज

By admin | Published: November 23, 2015 10:49 PM

अर्जांचे होणार निर्मूलन : पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर पडणार हातोडा

सिडको : सिडकोमधील अतिक्रमण निर्मूलनासाठी आता सिडको प्रशासन सज्ज झाले आहे. ज्या नागरिकांनी अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दिले आहेत, अशा तक्रारींचे निरसन करण्यास सुरुवात करण्यात आली असून, या तक्रारींबरोबरच इतर वाढलेल्या अतिक्रमणांवरही प्रशासन हातोडा मारणार असल्याने अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहे.सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकत घेत त्या जागेत सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात घरांची निर्मिती केली आहे. परंतु याच घरांवर आता अतिक्रमण करून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने सिडकोत अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको प्रशासनाने सहा योजनांपैकी एक ते पाच योजना या मनपाकडे हस्तांतरित केल्या आहेत. सहावी योजना मात्र अद्यापही हस्तांतरित झालेली नाही. परंतु प्रशासनाने हस्तांतरित केलेल्या पाचही योजनांकडील बांधकाम परवानगीचे हक्क स्वत:कडेच ठेवले आहेत. एक ते पाच योजना या मनपाकडे हस्तांतरित केल्या असल्यातरी बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना सिडको प्रशासनाकडेच जावे लागते. यामुळे मनपानेही वाढत्या अतिक्रमणांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. तसेच सिडको प्रशासनाकडे बांधकाम परवानगीचे अधिकार असल्याने येथील अतिक्रमण काढण्याचीही जबाबदारी ही सिडकोचीच असल्याचे मनपाकडून सांगण्यात येते. आजमितीला सिडको भागात सिडको प्रशासनाच्याच आशीर्वादाने अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमण काढण्यात यावे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनानेही आता याकडे लक्ष केंद्रित केल्याच सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, काही दिवसांपासून त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर, सिंहस्थनगर येथील नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निरसन करण्यास सुरुवात केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींपाठोपाठच रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरही हातोडा मारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)