गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने अंबड व सातपूरमधील बहुतांशी कारखाने बंद असून, अनेकांना वर्क फ्रॉम होमचे काम देण्यात आले असून, वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचाही कामावर परिणाम होत आहे. महावितरण विभागाच्यावतीने झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असली तरी यानंतर रस्त्यावर पडलेला झाडांचा पालापाचोळा हादेखील त्वरित उचलून घेणे ही महावितरणची जबाबदारी आहे; मात्र अनेक ठिकाणी हा पालापाचोळा तसाच पडून आहे. विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच अनेक घरांमध्ये कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून, काहींना ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. अशा रुग्णांसाठी अखंडित वीज पुरवठ्याची गरज असून, खंडित वीज पुरवठ्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची तक्रार केली जात आहे.
कोट===
दरवर्षी महावितरण विभागाच्यावतीने पावसाळा सुरू होण्याआधी झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम हाती घेण्यात येते. विनाकारण वीज पुरवठा खंडित करून कोणालाही त्रास देण्याची आमची अजिबात इच्छा नाही.
-प्रदीप पाटील, कार्यकारी अभियंता, सिडको.