शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
2
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
3
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
4
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
5
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
6
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
7
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
8
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
9
सणासुदीच्या काळात ₹10000 कोटी रुपयांची खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी? या बड्या कंपनीवर नजर?
10
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
11
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
12
हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
13
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
14
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
15
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
16
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
17
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
18
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा यांची तब्येत बिघडली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
19
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
20
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन

सिडकोला आता दोन धरणांमधून पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:49 PM

नाशिक: धरणांमध्ये मुबलक पाणी असूनही सतत पाणी बाणीला सामोरे जावे लागणऱ्या सिडकोवासीयांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागील अधिकाऱ्यांच्या वादांचा फटका बसला. त्यावर तोडगा म्हणून या विभागाला सध्या मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जात असला तरी गंगापूर येथूनही पुरवठा करण्यचा निर्णय महापौर सतिश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.८) बोलविलेल्या बैठकीत घेण्यात  आला.

ठळक मुद्देमहापौरांच्या बैठकीत नवा तोडगा मुकणे बरोबरच गंगापूरमधूनही पुरवठाआणखी एक जलवाहिनी टाकणार

नाशिक: धरणांमध्ये मुबलक पाणी असूनही सतत पाणी बाणीला सामोरे जावे लागणऱ्या सिडकोवासीयांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागील अधिकाऱ्यांच्या वादांचा फटका बसला. त्यावर तोडगा म्हणून या विभागाला सध्या मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जात असला तरी गंगापूर येथूनही पुरवठा करण्यचा निर्णय महापौर सतिश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.८) बोलविलेल्या बैठकीत घेण्यात  आला. त्याच बरोबर पाथर्डी येथील जलकुंभातून इंदिरानगर आणि सिडको विभागासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे आदेश महापौरांनी  दिले आहे.

सिडकोच्या काही प्रभागांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून त्यास पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता रविंद्र धारणकर आणि गोकूळ पगारे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचा आरोप सिडकोतील नगरसेवकांनी सोमवारी (दि.७) झालेल्या महासभेत केला होता. या नगरसेवकांनी ऑनलाईन महासभा असतानाही महापौरांच्या पीठासनसमोर जाऊन रोष व्यक्त केल्याने महापौरांनी मंगळवारी (दि.८) तातडीने या विषयावर बैठक बोलवण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार सकाळी ही रामायण या महापौर निवासस्थानी पार पडली. यावेळी सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, अविनाश धनाईत, रविंद्र धारणकर, ललित भावसार तसेच इंदिरानगर व सिडको विभागातील नगरसेवक उपस्थित होते.

मुकणे योजनेतून सिडकोच नव्हे तर पंचवटी आणि नाशिकरोडपर्यंत पाणी पुरवठा केला जात असल्याने सिडकोतील पाणी पुरवठ्यावर प्रतिकुल परीणाम झाल्याचा निष्कर्ष काढत सिडको भागाला परिसराला मुकणेबरोबरच काही प्रमाणात गंगापूर धरणातूनही पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौरांनी दिला. 

 या बैठकीस पूर्व विभागाचे सभापती ॲड. शाम बडोदे, सिडकोचे सभापती चंद्रकांत खाडे, नगरसेविका दिपाली कुलकर्णी, रत्नमाला राणे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, डी. जी. सूर्यवंशी, किरण गामणे, मुकेश शहाणे, छाया देवांग, प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड, सुदाम डेमसे, दीपक दातीर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई