सिडको : येथील पवननगर जलकुंभातून महापालिका अधिकाºयांच्या संगनमताने दररोज एक खासगी बांधकाम व्यावसायिक हजारो लिटर पिण्याचे पाणी टँकरने चोरून नेत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेडून दरमहा ५० टॅँकर विकत घेण्याच्या नावाखाली दीडशेहून अधिक टॅँकर जलकुंभातून भरले जात असून, ते बांधकामासाठी वापरले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सिडकोत एकीकडे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे मनपा अधिकाºयांच्या संगनमताने शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकास इमारतीचे बांधकाम करण्यास पिण्याचे पाणी दिले जात आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक पवननगर जलकुंभातून मनपाकडून दरमहा ५० टॅँकर पाणी विकत घेत असला तरी, प्रत्यक्षात १५० ते २०० टॅँकर भरून नेत असल्याची बाब पाण्याच्या टाकी शेजारी राहणाºया मनोहर काळे यांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे जलकुंभावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयातही दररोजच्या टॅँकरच्या फेºयांचे चित्रीकरण झाले आहे.काळे यांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न करून मनपा कर्मचाºयांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन टाळले. त्यामुळे त्यांनी नगरसेविका किरण गामणे यांच्या कानावर सदरचा प्रकार टाकला. त्याची खात्री करण्यासाठी सोमवारी नगरसेविका गामणे व बाळा दराडे यांनी सदर टॅँकर पाणी भरत असताना रंगेहाथ पकडला व चालकाला जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याजवळ असलेल्या टॅँकर भरण्याच्या पावत्या तपासून बघितल्या असता त्यात आगाऊ तारखाच्या पावत्या असल्याचे दिसून आले. तर महिन्याला ५० टँकरच्या पावत्या असताना १५० ते २०० टँकर चोरून नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात रेकॉर्ड झाले असल्याचे गामणे यांनी सांगितले. सदरचे पाणी बांधकामासाठी वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सिडकोत बांधकाम व्यावसायिकांकडून जलकुंभातून पाण्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:22 AM
पवननगर जलकुंभातून महापालिका अधिकाºयांच्या संगनमताने दररोज एक खासगी बांधकाम व्यावसायिक हजारो लिटर पिण्याचे पाणी टँकरने चोरून नेत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ठळक मुद्देकिरण गामणे यांचा आरोपमनपा अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय