नाशिक : भविष्यातील जलसंकट लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानुसार सोमवार दि. २२ पासून सिडको आणि नाशिक पूर्व भागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोत रविवारी पाणीसाठ्याची लगबग सुरू होती. महिलावर्गाने घरातील छोटेमोठी भांडीही पाण्याने भरून ठेवली. गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची वस्तुस्थिती पाहता मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाणीकपातीसंबंधीचे वेळापत्रक जाहीर करत विभागवार पाणी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. सोमवारी सिडकोतील जलशुद्धीकरण केंद्र, बारा बंगला, पवननगर पंप, चेतनानगर जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग ४१ ते ४९ आणि संपूर्ण परिसर तसेच प्रभाग ५१ आणि ५२ मध्ये पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
आज सिडकोत पाणी बंद
By admin | Published: February 21, 2016 11:37 PM