सिडको :-सिडको प्रशासनाने यापूर्वी सहा योजना उभारल्या असून आता पांजारपोळच्या जागेवर सिडकोकडून आणखी नवीन योजना उभारली जाण्याची शक्यता आहे. शनिवारी जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन नवीन योजनांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सिडकोचे प्रशासक घनश्याम ठाकूर यांनी दिली.भुजबळ फार्म येथे झालेल्या बैठकीत सिडको प्रकल्पाचा अनुषंगाने झालेल्या बैठकीत पांजरपोळ ट्रस्टची बाराशे एकर जमीन सिडकोला नवीन प्रकल्पाकरीता हस्तांतरित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव नगरविकास खात्याकडे कडे सादर करणे, सिडकोचा मेट्रो प्रकल्प आणि पर्यटन प्रकल्पातील अनुभवाचा विचार करता नाशिक मेट्रो तसेच जिल्'ातील शासना द्वारा विकसित करण्यात येणार असलेली पर्यटन स्थळे हे प्रकल्प देखील सिडकोकडे वर्ग करावे याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याबाबत चर्चा झाली. या विषयांबाबत लवकरच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.गेल्या कित्येक वर्षांपासून सिडको च्या नवीन योजनेबाबत चर्चा सुरू होती आता हा प्रकल्प नाशकात नव्याने सुरू झाल्यास नाशिककरांच्या सिडको कडून शहराच्या विकासाची अपेक्षा वाढणार आहेत.