लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : शेतकऱ्यांचा आजपासून सुरू झालेल्या संपाचा परिणाम सिडको भागात दिसून आला. सकाळपासूनच सिडकोतील भाजीबाजारातील काही दुकानदारांकडे किरकोळ माल वगळता संपूर्ण भाजीबाजारात शुकशुकाट होता शेतकरी गुरुवार (दि.१) पासून बेमुदत संपावर असल्याने ग्राहकांनी एक दिवस अगोदरच भाजीपाला खरेदी केला होता. भाजीपाला विक्रे त्यांनीही शेतकऱ्यांकडून अधिक माल घेतला होता, त्यामुळे आज जरी संपाचा परिणाम अधिक जाणवत नसला तरी उद्यापासून मात्र ग्राहकांनादेखील अडचणींचा सामना करावा लागणार आहे.सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उपेंद्रनगर, जुने सिडको आदी भाजीबाजारात मात्र आज शुकशुकाट होता. शेतकरी संपावर जाणार असल्याने भाजीविक्रेत्यांनी जादा घेतलेला मालही संपुष्टात आल्याने संध्याकाळी बाजार ओस पडला होता. संप जर असाच सुरू राहिला तर याचे परिणाम अधिक गडद दिसतील. एकूणच संपाचा परिणाम व्यापारी, व्यावसायिकांबरोबरच ग्राहकांवर होणार असल्याचे दिसत आहे.
सिडकोतील भाजीबाजार पडला ओस
By admin | Published: June 02, 2017 1:24 AM