सिडको : सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच पवननगर येथील हनुमान मंदिर, उत्तमनगर भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.सिडको प्रभाग क्रमांक २७, भाद्रपद सेक्टर येथे ह्यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात हनुमान जयंतीनिमित्त पहाटे अभिषेक कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका कावेरी घुगे, लोकनेता प्रतिष्ठानचे व्यवस्थापक अध्यक्ष गोविंद घुगे यांच्या हस्ते झाला.सकाळी भजन, कीर्तन तसेच सायंकाळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर हनुमंत रायच्या पादुकांची पालखी सोहळा परिसरात टाळ मृदुंग व हरिनामाच्या जयघोषात काढण्यात आला. यावेळी दत्तात्रय शिंदे, संजय सहाणे, संजय देशमुख, बाळासाहेब साबळे, पांडुरंग आरोटे, पिंटू दुसाने, भास्कर पवले, अशोक राउंदल, विवेक कांबळे, आबा दुसाने, नाईकवाडे माउली, आबा दुसाने, महेंद्र आव्हाड, छोटू कासार, कल्पना शिंदे, निर्मला, भतीवल, वैशाली देशमुख, नंदा कुडेकर, प्रभागातील व परिसरातील नागरिक महिला बाळ कदम यांचे हरिकीर्तन होईल व शनिवार ते बुधवारपर्यंत पहाटे पतंजली योग समिती श्री स्वामी समर्थ नित्य योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (२०) रात्री मुक्ताईनगर येथील युवा कीर्तनकार भागवताचार्य विशाल महाराज खोले याचे कीर्तन झाले.मिरवणूकहनुमान जन्मोत्सवानिमित्त महाजननगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पहाटे आरती, भजन, अभिषेक आदी कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर इंद्रप्रस्थ कॉलनी, जयहिंद कॉलनी भागातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हनुमानाच्या वेशभूषेत बालके सहभागी झाली होती.
सिडकोत हनुमान जयंती उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:40 PM