सिडको : नाशिक येथे शनिवारी (दि. २४) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी आज सिडको भागातून दुचाकी रॅली काढून जनजागृती करण्यात आली. मूक मोर्चात जास्तीत जास्त महिला व तरुणांसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सिडकोतील पाटीलनगर मैदान येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात करण्यात आली. सदर रॅली सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, अंबड या भागातून काढण्यात आली. कोपर्डीतील मुलीवर पाशवी बलात्कार व हत्त्येच्या निषेधार्थ तसेच आरक्षण अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत नाशिक येथे शनिवारी (दि. २४) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी जनजागृती करण्यात आली. या दुचाकी रॅलीत बाळासाहेब पाटील, जगन पाटील, अण्णा पाटील, डी. जी. सूर्यवंशी, कैलास अहिरे, आशिष हिरे, वैभव देवरे, श्यामकुमार साबळे, गणेश अरिंगळे, विजय पाटील, आकाश कदम, मुकेश शेवाळे, स्वप्नील ठोंबरे, राकेश ढोमसे, मुन्ना हिरे, अमोल पाटील, योगेश गांगुर्डे, प्रीतम भामरे, शैलेश साळुंखे, आशिष सिंग, बबन जगताप, राम पाटील, अरुण दातीर आदिंसह समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
सिडकोत मोटारसायकल रॅली
By admin | Published: September 23, 2016 1:40 AM