नाशिक : प्रतिबंधित गुटखा व सिगारेटचा साठा करून विक्री करणाऱ्या दिंडोरी रोडवरील खुशबू ट्रेडर्स या दुकानावर सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मंगळवारी छापा टाकला़ या छाप्यामध्ये सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा गुटखा व सिगारेट जप्त करण्यात आले असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आकाश पेट्रोलपंपाजवळील खुशबू ट्रेडर्स या दुकानात प्रतिबंधित गुटखा व परदेशी सिगारेटचा साठा आणि विक्री होत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांना मिळाली होती़ नखाते यांनी कर्मचाºयांसह छापा टाकला असता संशयित विजय भागचंद बाफना अवैध गुटखा व सिगारेटचा साठा करून विक्री करीत असल्याचे आढळून आले़ नखाते यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख आणि अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांना बोलावून घेत जप्त मालाचा पंचनामा केला़ पोलिसांनी दुकानातून जप्त केलेल्या मालामध्ये १ लाख ९२ हजार २४५ रुपये किमतीचा विमल, हिरा, रॉयल, वाह, राजनिवास, सिमला, मिराज या कंपन्यांचा गुटखा पानमसाला तर १७ हजार ७९५ रुपये किमतीचे शूटर, मॅक्सवंड, गुडगरम, ब्लॅक, रुईली रिव्हर या कंपनीच्या सिगारेट पाकिटांचा समावेश आहे़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून खुशबू ट्रेडर्स व मालाचे गुदामास सील ठोकले आहे़ या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी महाजन, बोडखे, निगळ, भदाने यांचा समावेश होता़
सव्वादोन लाखांच्या गुटख्यासह सिगारेट जप्त दिंडोरीरोड : म्हसरूळ खुशबू ट्रेडर्सवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:04 AM
नाशिक : प्रतिबंधित गुटखा व सिगारेटचा साठा करून विक्री करणाऱ्या दिंडोरी रोडवरील खुशबू ट्रेडर्स या दुकानावर सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मंगळवारी छापा टाकला़
ठळक मुद्देप्रतिबंधित गुटखा व परदेशी सिगारेटचा साठा आणि विक्री जप्त मालाचा पंचनामा केला़