सिडको : दरवर्षीप्रमाणे सिडको परिसरात मोठ्या उत्सहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षी बहुतांशी मंडळांच्या वतीने तसेच नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता कोरडा रंग लावला. यावेळी सिडको व अंबड भागातील गल्ली-बोळात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यात महिला व बालगोपाळांचा सहभाग विशेष जाणवला.सिडको व अंबड भागात यंदाच्या वर्षीही रंगपंचमी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. सकाळपासून लहान मुलांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. विशेष म्हणजे यावेळी महिला वर्गाचा सहभाग अधिक जाणवला. बहुतांशी ठिंकाणी पाण्याचा वापर न करता पारंपरिक कलरचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. जुने सिडकोतील तुळजा भवानी चौक, विजयनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, हनुमान चौक, गणेश चौक सार्वजनिक मंडळाच्या वतीने डीजेचा वापर न करता इतर वाद्य वाजवून रंगपंचमीत सहभाग घेतला.दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही हनुमान चौकातील सखी महिला मंडळाने कोरडी रंगपंचमी साजरी केली. यात परिसरातील महिला तसेच लहान मुलांनी गर्दी केली होती.
सिडकोत उधळले कोरडे रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:57 PM