टमाटा दर वाढले
बाजार समितीमध्ये टमाट्याच्या दरात वाढ झाली असून येथे टमाट्याला ३५० ते १२५० रु जाळी याप्रमाणे दर मिळत आहे. वांगी, दुधी भोपळा, कारली , काकडी यांच्या दरात सुमारे दहा टक्कयांनी घसरण झाली आहे.
चौकट-
हापुसचे आगमण
नाशिक बाजार समितीत या सप्ताहात देवगड हापु अंब्याची आवक झाली. या अंब्याला २०० ते ३०० रुपये किलोचा दर मिळाला. संत्रा दरात वाढ झाली असून संत्रा ६० ते ९५ रुपये किलो दराने विकला जात आहे.
चौकट-
किराणा दर स्थिर
किराणा बाजारात ग्राहकी नसल्याने सर्वच मालाचे भाव स्थिर राहीले आहेत. येत्या काही दिवसांत बाजारात तेजी येण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.
कोट-
कंपण्यांनी भाव वाढवले नाही तसे ते कमीही केले नाहीत. व्यापाऱ्यांकडे पडुण असलेला माल काढण्यासाठी मंदिचा व्यवसाय करावा लागला. मार्च अखेरचे सावट बाजारावर आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट-
मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. वाढत्या उन्हात भाजीपाला पिकवितांना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. उत्पादन खर्चही वाढला आहे. - रामचंद्र दौंडे, शेतकरी
कोट-
भाजीपाला महागला आहे. मागील काही दिवसांपासून तेलाचे दरही वाढले असल्याने सर्वसामांन्यांना खर्चाचे नियोजन करताना मोठी अडचण येते. शासनाने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. - रोहिणी गाडे, गृहीणी