पंचवटी : दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे शनिवारच्या दिवशी पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांवर त्याचा परिणाम जाणवला. आवक घटल्याने शनिवारी (दि.१९) बाजार समितीत कोथिंबीर प्रति जुडीला १५०, तर मेथी ६० रु पये बाजारभावाने विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गेल्या आठवडाभरापासून कोथिंबीर ४० ते ५० रु पये, तर मेथी जुडीला १५ ते २० रु पये असा बाजारभाव मिळत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक बाजार समितीत विक्र ीसाठी येणाºया सर्वच शेतमालाची आवक घटली आहे. शनिवारच्या दिवशी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर पंधरा हजार रु पये, तर मेथी सहा हजार रु पये शेकडा दराने विक्र ी झाली. पावसाचा परिणाम जाणवलेल्या बाजारभावात वाढ झाली. आगामी आठवड्यातदेखील पावसाने हजेरी लावली तर पालेभाज्यांचे बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.
कोथिंबीर १५० रुपयांना, तर मेथी ६० रु पये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 1:59 AM