पंचवटी : बुधवारपाठोपाठ गुरुवारी (दि.१४) कोथिंबीरची आवक कमी प्रमाणात झाल्याने कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहेत. पंधरवड्यापूर्वी अवघ्या एक रुपया प्रति जुडी अशा मातीमोल बाजारभावाने विक्री झालेल्या कोथिंबीर जुडीला लिलावात ८० रुपये प्रति जुडी बाजारभाव मिळाला.परतीच्या पावसाने सलग तीन-चार दिवस हजेरी लावल्याने शेतातील कोथिंबीर मोठ्या प्रमाणात भिजलेल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरला आठ हजार रुपये शेकडा, असा बाजारभाव मिळाला. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने व त्यातच परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने कोथिंबीर माल भिजला गेला आहे त्यातच एकते दोन दिवसांपासून परजिल्ह्यातून मुंबईत कोथिंबीर मालाची आवक कमी झाली आहे. गुरुवारी लिलावात ८० रुपये प्रति जुडी बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.
कोथिंबीर 80 रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:46 AM