नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत पालेभाज्या व्यापाऱ्यांना कोरोना लागण झाल्याने येथील व्यावहारांवर आलेले निर्बंधासोबतच याच काळात पालेभाज्यांना मागणी वाढल्याने पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७० रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली अशी माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली. बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतील पालेभाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणचे आठवडे बाजार बंद केले आहेत. तर भाजीपाला विक्री करणाऱ्यांना जागा व वेळ ठरवून दिलेली आहे. त्यातच ग्राहकही हातगाडीवर भाजीपाला खरेदीसाठी टाळाटाळ करीत असल्याने आहेत. ग्राहकांकडून रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्री करणाऱ्यांकडे गर्दी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजार समिती आवारात पालेभाज्या विक्रीसाठी आणण्यापेक्षा थेट रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना भाजी विकण्याचा पयार्य निवडला आहे. त्यामुळे बाजार समिती आवारात दररोज होणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. दरम्यान, बाजारसमितीतून मुंबई व मुंबई उपनगरात रोज भाजीपाला माल रवाना केला जात असल्याने मागणी वाढली असताना आवक घटल्याने पालेभाज्या तेजीत आल्या आहेत. त्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वत्र पाऊस झाला असून परिणामी शेतातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक घटल्यामुळेही बाजारभाव तेजीत आलेले आहेत.
कोथिंबीर ७० रुपये जुडी ; नाशकात पालेभाज्या तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 3:44 PM
नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७० रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली.बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतील पालेभाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली आहे.
ठळक मुद्देपालेभाज्यांना निसर्ग चक्रीवादळाता फटका शेतमालाचे नूकसान झाल्याने आवक घटली कोरोना आणि चक्रीवादळामुळे पालेभाज्या तेजीत