नाशिक : कोथिंबीर, फरसबी यांचे बाजारभाव गगनाला भिडले असून, पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या तुलनेत इतर सर्व भाज्यांचे भाव स्थिर असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नाशिककरांना आणखी दिलासा मिळू शकतो. फरसबी उन्हाळ्यात जास्त टिकत नसल्याने आणि त्याची शेतकºयांकडून कमी प्रमाणात लागवड केली जात असल्याने त्याची आवक कमी झाली असून, ५० ते ७० रुपये किलो या भावाने ती विकली जात आहे. उन्हाळ्यात कोथिंबीर, मेथी असा पाल्याभाज्यांचे दर वाढलेलेच असतात. मटारही तेजीत आहे. साधारण १० ते १५ रुपये किलो या भावाने विकला जाणारा बटाटाही सध्या २०-२५ रुपयांनी विकला जात आहे. वाळवणामुळे बटाट्याला भाव आहे.असे आहेत पालेभाज्यांचे भाव वांगे-२० , गवार- ४० ते ६० भेंडी- ३० , पालक जुडी- ५ ते १० मेथी- २० ते २५ , शेपू- १५ कोबी प्रतिगड्डा- ८ ते १० फ्लावर प्रतिगड्डा - १० ते १५ डांगर- १० , सिमला- २० दुधीभोपळा- १० ते १५ फरसबी- ६० ते ७० गिलके- ४० , दोडके- ४० कारले- ३० ते ४० , टमाटे- १० हिरवी मिरची- ३०, बटाटे- २० ते २५ काकडी-२० ते २५
कोथिंबीर, फरसबी तेजीत; उर्वरित भाज्यांचे भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:23 AM