शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

कोथिंबीर जुडी एक रुपयाला

By admin | Published: August 08, 2016 12:03 AM

आवक वाढली : बाजार समितीत शेतकऱ्यांनी फेकली कोथिंबीर

पंचवटी : महिन्याभरापूर्वी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या कोथिंबीरला रविवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत मातीमोल बाजारभाव मिळाला. लागवड खर्च तर सोडाच गाडी भाडेही निघाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत घरचा रस्ता धरला.रविवारी बाजारसमितीत कोथिंबीर १०० रूपये शेकडा दराने विक्र ी झाली. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना भरपुर पाणी मिळत आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. रविवारच्या दिवशी बाजारसमितीत प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे ढासळले. महिन्याभरापूर्वी १९० रूपये प्रति जुडी दराने कोथिंबीर विक्र ी झाली होती. रविवारच्या दिवशी काही शेतकऱ्यांनी आणलेला माल ओला असल्याने त्या मालाचा लिलाव झालाच नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने ती कोथिंबीर बाजारसमितीत टाकून दयावी लागली. सुमारे १५ ते २० वक्कल शेतकऱ्यांनी बाजारसमितीत टाकून देत घरचा रस्ता धरला. काही कोथिंबीरच्या मालाचा लिलाव झाला परंतु एक रूपया प्रति जुडी असा मातीमोल बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बाजारसमितीत रविवारी काही कोथिंबीरच्या मालाला ५ तर काही कोथिंबीरला २० रूपये प्रति जुडी असाही बाजारभाव मिळाला. (वार्ताहर)