शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

नागरिकांची उडाली तारांबळ

By admin | Published: June 04, 2017 2:17 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी दुपारी शहराला झोडपले. वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ उडाली.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी दुपारी शहराला झोडपले. वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ उडाली.गेल्या दोन दिवसांत शहरात ढगाळ वातावरण झाल्याने उष्मा अधिक वाढला होता. यामुळे नाशिककर घामाघूम होत होते. शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरीदेखील कमाल तपमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या पंधरा मिनिटांतच शहराचे रस्ते जलमय झाले होते. महापालिकेच्या भुयारी पावसाळी गटारी तुंबल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी चेंबर तुडुंब भरून रस्त्यावर वाहत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठल्याही घटनेत जीवितहानी झाली नाही. दुपारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच शिंगाडा तलाव अग्निशामक मुख्यालय, पंचवटी, सिडको, सातपूर उपकार्यालयांचे दूरध्वनी खणखणन्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासाच्या अंतरावर शहरासह उपनगरांमध्ये सुमारे पंचवीस ते तीस ठिकाणी झाडे कोसळल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान विविध ठिकाणी कोसळलेली झाडे हटविण्याचे काम करत होते. पहिल्याच पावसामुळे शहर परिसरातील जवळपास सर्वच रस्ते जलमय झाले होते. परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत होते. परिसरातील रस्त्यांना काहीकाळ कालव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.