गंगापूर : परिसरात मद्यपी टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पोलिसांनी गस्त वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. परिसरात मद्यपींचा उपद्रव, भुरट्या चोऱ्या तसेच टवाळखोरांच्या संख्येत वाढ होत असून, अवैध धंदेही सुरू असल्याचे दिसते. गंगापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ग्रामीण भागाचाही समावेश आहे. गंगापूररोड हा उच्चभ्रू वस्तीचा भाग असून, गंगापूर रोडलगत थेट गंगापूर धरण ते गिरणाºयापर्यंत रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू राहत आहे. परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर व मद्यपींच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता गंगापूर पोलीस स्टेशन व नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या अखत्यारितील अधिकारी व कर्मचाºयांच्या रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. या रोडवरील काही हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत विनापरवाना मद्यविक्री केली जात आहे. गंगापूर परिसर व ग्रामीण भागात गंगापूर व तालुका पोलीस कर्मचाºयांनी गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
गंगापूर परिसरात मद्यपी टवाळ खोरांमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:15 AM