सिडको : ‘केदार कुटुंबीयांना न्याय द्या’, ‘महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा’, अशी मागणी करत महावितरणकडून आर्थिक नुकसानभरपाईबाबत केल्या जाणाºया टाळाटाळच्या निषेधार्थ अंबड पोलीस ठाण्यात परिसरातील महिलांसह नातेवाइकांनी सोमवारी (दि.३०) ठिय्या आंदोलन केले. अखेरीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत संतप्त आंदोलकांची समजूत काढत शासननियमाने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांकडून लेखी स्वरूपात यावेळी हमी घेत तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शिवपुरी चौकात रविवारी विजेचा धक्का लागून केदार कुटुंबातील सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला, तर भाऊ, बहीण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर महावितरणच्या अधिकाºयांनी घटनास्थळी येऊन के दार कुटुंबीयांमधील मृतांच्या वारसदारास प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात तातडीची कुठलही मदत करण्यात आली नाही. सोमवारी महावितरणकडून याबाबत पुन्हा निष्काळजीपणा दाखविला
अंबड पोलीस ठाण्यात नागरिकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:49 AM