शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
2
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
3
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
4
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
5
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
6
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
7
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
8
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
9
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
10
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
11
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
12
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
13
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
14
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
15
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
16
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
17
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
18
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
19
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
20
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

दरेगाव येथे डेंग्यूसदृश आजाराच्या धास्तीने नागरिक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2015 9:55 PM

दरेगाव येथे डेंग्यूसदृश आजाराच्या धास्तीने नागरिक चिंताग्रस्त

दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे विविध विषाणूजन्य आजारांनी अनेक नागरिक हैराण झाले आहेत. सध्या डेंग्यूच्या साथीबाबत सर्वत्र चर्चा होत असल्याने नागरिकांची धास्ती वाढली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने धुळे येथील शासकीय प्रयोगशाळेत १३ संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, त्यापैकी १२ रुग्णांना विषाणूजन्य आजारांची, तर एका रुग्णास प्राथमिक अवस्थेत डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे.गावातील अन्य तीन महिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत; मात्र त्यांच्या आजाराचे निदान नसल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी गावातील एका व्यक्तीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गावात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात थंडी, ताप, हातपाय दुखणे व अन्य व्याधींनी ग्रस्त रुग्ण वाढत असल्याने नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा बऱ्याच दिवसांनी केला जात असल्याने ग्रामस्थ पिण्याचे पाणी साठवून ठेवतात. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. गावात व परिसरात ग्रामपंचायतीने अस्वच्छ जागा स्वच्छ करावी तसेच गावात पाणीपुरवठा लवकर करावा, त्यामुळे पाणी जास्त दिवस साठविले जाणार नाही. तसेच फॅगिंग मशिनद्वारे नियमित फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, चांदवडचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी गावात भेट दिली असता, नागरिकांनी त्यांना गावातील आरोग्यविषयक अडचणी सांगितल्या. त्यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जायभावे, दरेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल देवरे, आरोग्य सहाय्यक एन. एम. गोजरे, आरोग्य पर्यवेक्षक डी. एम. पाटील आर. एस. नवले आदिंच्या पथकांने सहा विभाग करून जबाबदारी निश्चित केली. आरोग्य पथकामार्फत गावात सर्वेक्षण करण्यात आले. पथकात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी, कार्यकर्ता, आशा आरोग्य सहाय्यक आदि घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. (वार्ताहर )