कोरोना : शहरवासीयांपासून चार हात दूरपेठ : कोरोना विषाणूपासून स्वत:सह गावाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे.कोरोनामुळे शाळा- महाविद्यालयासह शासकीय व खासगी कार्यालयांना सुट्या घोषित करण्यात आल्याने बहुतांश लोकं कुटुंबासह गावाकडे फिरताना दिसून येत आहे. गावाकडच्या मेनूचा आस्वाद घेत नातेवाइकांकडे डेरा टाकणाºया शहरी पाहुण्यांपासून गावाची मंडळी मात्र चार हात लांबच असल्याचे दिसून येतात. आदिवासी भागात कुटुंबांची संख्या नेमकीच असल्याने कोणाकडे पाहुणा आला ते लगेच समजते. काही गावांनी तर बाहेरून येणाºया नागरिकांना गावबंदी केल्याने ग्रामीण जनतेनेही कोरोनाचा धसका घेतला आहे.आमच्या ग्रामपंचायती अंतर्गत धानपाडा, बोरपाडा, खामशेत, बिलकस आदी गावे येत असून, बिलकस येथे व्यावसायिक रिसॉर्ट आहे. शहरातून पर्यटकांची येथे कायम वर्दळ असते. मात्र कोरोना प्रकरणामुळे या परिसरात येणाºया पर्यटकांना पूर्णपणे बंदी करण्यात आली असून, खेडेगावातील जनता सुरक्षित असताना शहरी पाहुण्यांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.- रमेश दरोडे, सरपंच, धानपाडा
शहरी पाहुण्यांना केली गावबंदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 9:12 PM
कोरोना : शहरवासीयांपासून चार हात दूरपेठ : कोरोना विषाणूपासून स्वत:सह गावाचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागात गाव स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातून गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांना गावबंदी केली जात आहे.