नाशिक : विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. गणेश विसर्जनाच्या दिवशी सामाजिक संस्थांनी एकत्र येत मूर्ती-निर्माल्य संकलनाची भूमिका पार पाडली. शहरासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, अंबड, नाशिकरोड आदि उपनगरांमध्येदेखील नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केले.पीओपीच्या मूर्तींमुळे जल प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पायंडा नाशिक महानगरपालिकेसह विविध पर्यावरणस्नेही संस्था, सेवाभावी समाजसेवी संस्थांनी राबविला. जनप्रबोधन करण्यावर भर दिला आणि मूर्ती-निर्माल्य दानाचे महत्त्व पर्यावरणाच्या दृष्टीने पटवून दिले. गोदावरीच्या विसर्जन दिवशी होणाºया प्रदूषणाच्या गंभीर दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. मूर्ती-निर्माल्य संकलनासाठी पुढे आलेल्या संस्थांना महापालिकेकडूनही सहकार्य केले गेले. यावर्षीदेखील विविध संस्थांच्या वतीने मूर्ती संकलन करण्यात आल्या. ‘मूर्ती दान करा, नदीचे प्रदूषण टाळा’,‘निर्माल्य नदीत नको, वाहनात हवे’, ‘देव द्या, देवपण घ्या...’ ‘चला, संकल्प करूया आपली गोदावरी स्वच्छ ठेवूया...’ अश्या आवाहनाला अनेक नागरिकांनी प्रतिसाद देत या उपक्रमात सहभाग घेतला.इच्छापूर्ती गणेश मंदिर, सावतानगर ‘देव द्या, देवपण घ्या’ या संकल्पनेतून प्रभाग २५ मधील इच्छापूर्ती गणेश मंदिर रायगड चौक येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. या तलावात परिसरातील भाविकांनी सुमारे ४०० मूर्ती संकलन करण्यात आल्या होत्या. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, मंडळाचे श्रीकांत शिंदे, प्रकाश पाटील, निखील भारते यांसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकडे शहरातील नागरिकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:05 AM