नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणार्या घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई येथे भाजीपाला घेऊन जाणारे पिक अप, टेम्पो, आदी वाहनांच्या चालकांची तसेच त्यांच्या कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी येथे भाजीपाल्याची सर्वात जास्त आवक जावक मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर स्थानिक वाहनाने होत असल्यामुळे मुंबईहून येणाºया भाजीपाला वाहनांच्या चालकांची व त्यांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात यावी, यामुळे तालुक्यात तसेच त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण होणार नाही अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. इगतपुरीच्या तहसिलदार अर्चना पागीरे यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, मुंबईहून येणाºया भाजीपाला वाहनांच्या चालकासोबत एकच व्यक्ती देण्यात यावा. तसेच चालकाने गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असून चालकाने मास्क लावूनच वाहन चालवायच्या सूचना घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला बैठकीदरम्यान दिल्या असल्याचे पागीरे यांनी सांगितले. तसेच ग्रामस्तरावर देखील एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामध्ये सरपंच हे अध्यक्षस्थानी असून ग्रामसेवक, तलाठी, सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशासेविका या पथकामध्ये सदस्य म्हणून काम करत आहेत. यांच्यामार्फत बाहेरून येणाºया प्रत्येक व्यक्तीची माहिती दैनंदिन येत असते. तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये काही काळाबाजार होत असेल, किंवा दुकानदार किराणा माल जास्त दराने देत असेल तर त्यांच्यावर तिथेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश तालुक्यातील तलाठी यांना दिले असल्याचे तहसिलदार पागीरे यांनी माहिती देतांना सांगितले.
तपासणी करण्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:59 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणार्या घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई येथे भाजीपाला घेऊन जाणारे पिक अप, टेम्पो, आदी वाहनांच्या चालकांची तसेच त्यांच्या कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देग्रामस्तरावर तपासणीसाठी विशेष पथकाची नेमणूक