गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक कोरोना महामारी या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. कोरोना आजारामुळे अनेकांना आपले घरचे कर्ते पुरुषदेखील गमवावे लागले असून, यातून सावरत नाही तोच चिकुन गुन्या व डेंग्यू या आजाराने डोके वर काढले आहे. अंबड, दातीर मळा, चुंचाळे शिवार यासह परिसरातील अनेक भागात चिकुन गुन्यासदृश आजाराचे असंख्य रुग्ण आढळले आहेत. अनेकांना ताप येणे तसेच हातपाय दुखणे, अशक्तपणा येणे, सांधेदुखी असे त्रास होत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलत योग्य ती दखल घेऊन या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.
--कोट---
दातीर मळा, चुंचाळे शिवार, अंबड यासह परिसरात डेंग्यू तसेच चिकुन गुन्यासदृश आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेने याबाबत योग्य ती दखल घेऊन या भागात लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा, याबाबत तीव्र आंदोलन छेडणार.
रामदास दतीर, सिडको विभाग अध्यक्ष, मनसे