आडगाव : महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २३ खेड्यांच्या पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. पालिका हद्दीत समावेश होऊन गावाचा विकास होईल, अशी येथील रहिवाश्यांची अपेक्षा होती पण अजूनही आडगाव ‘पारंपरिक गाव’ किंबहूना खेडेच राहिले आहे. या गावातील जुन्या वस्त्या, जुनी घरे, गावाची शिव अजूनही जशीच्या तशीच आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना आडगाव स्मार्ट कधी होणार? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे. आडगाव परिसराची नवीन ओळख नाशिक शहरात शिक्षणाचे माहेरघर म्हणून तयार झाली आहे. नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यात आडगावचा आजूबाजूचा परिसर रहिवासी झोनमध्ये असल्यामुळे जत्रा हॉटेल परिसर, कोणार्कनगर, सागर व्हिलेज, श्रीरामनगर, शरयू पार्क अशा नवीन वसाहती उभ्या राहिल्याने या परिसराचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे नवीन व्यवसाय या परिसरात तयार झाले. अनेक नवीन कॉलनी, वसाहती तयार झाल्या, पण तरी आजही आडगावचा पाहिजे तसा विकास दिसून येत नाही. अजूनही भारनियमन सुरू झाल्यांनतर १४ तास अंधारात काढावे लागतात त्यामुळे आम्ही नक्की महानगरपालिका क्षेत्रांत राहतो काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. आज गावात प्रत्येकाच्या घरात चारचाकी आहे, पण त्या चारचाकी गाड्या गावात फिरू शकतील असे मोठे रुंद रस्ते गावकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. अजूनही मळे परिसरात कच्चे रस्ते आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहे, तर गावातील मुख्य रस्ता म्हणजेच जुना मुंबई-आग्रा महामार्ग अरुंद आहे. शिवाय अजूनही महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित नसल्याने या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. यासोबत अजूनही गावात आले की जुने दुकाने, टपºया बघायला मिळते.
नागरिकांच्या भावना : समस्या त्याच खेड्याचे प्रश्न सुटेना आडगाव स्मार्ट कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 1:09 AM
आडगाव : महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २३ खेड्यांच्या पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. पालिका हद्दीत समावेश होऊन गावाचा विकास होईल, अशी येथील रहिवाश्यांची अपेक्षा होती.
ठळक मुद्देया परिसराचा झपाट्याने विकास झालाआजही आडगावचा पाहिजे तसा विकास दिसून येत नाही