ठळक मुद्देनागरिक मात्र एकदम बेफिकीरपणे रस्त्याने फिरताना दिसून येत आहे.
मानोरी : कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापार, उद्योग सुरळीत चालू झाले असून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व आस्थापने सुरू झाले असताना नागरिक मात्र एकदम बेफिकीरपणे रस्त्याने फिरताना दिसून येत आहे.कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना प्रशासनाने निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिक सर्रासपणे विनामास्कचे फिरताना आढळून येत आहे. तसेच सर्व प्रकारच्या दुकानांत गर्दी करत फिजिकल डिस्टसिंगचा विसर देखील नागरिकांना पडत चालला असल्याचे दिसून येत आहे. नागरिक असेच बेफिकिरीने विनामास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टसिंगचे नियम पाळत नसल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटे विषयी भीती व्यक्त केली जात आहे.