आता मनपा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी रेट कमी
नाशिक शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण बाधीत होण्याचे प्रमाण केवळ 100 तपासण्यानंतर 10 टक्के इतके होते. नंतर मार्च महिन्यात करोना संसर्ग वाढला जाऊन हा करोना बाधीत होण्याचा दर 44 ट्न्नयापर्यत गेला होता. 13 ते 16 मार्च दरम्यान 44 ट्न्नयापर्यत गेलेला बाधीत होण्याचा दर 17 मार्च रोजी 32 टक्के व 18 मार्च रोजी 28 ट्न्नयापर्यत खाली आला आहे. महपाालिकेकडुन पुर्वी लक्षणे असलेल्या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जात होते. आता सर्वच नागरिकांचे अर्थात सुपर स्प्रेडरचे काम करणारे विक्रेते, दुकानदार, व्यावसाय यांचे सर्वाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहे. यामुळे आता करोना बाधीत होण्याचा दर खाली आला आहे.