सिडको : घराजवळून जाणाऱ्या धोकादायक विद्युततारांनी सिडकोत पुन्हा दोन बळी घेतले आहेत. येथील रहिवाशांच्या डोक्यावर सातत्याने लोंबकळणाºया वीजतारा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात रविवारी (दि.२९) घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकत असताना वीजतारांच्या विद्युतप्रवाहचा झटका लागून सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर भाऊ, बहीण गंभीरपणे जखमी झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरणच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच अनेकांना जीव गमवावा लागले असल्याची भावना सिडकोवासीयांना अनेकदा व्यक्त करूनही त्यांच्या भोवती मृत्यू म्हणून लटकणाºया वीजतारा अजूनही कायम आहेत.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शिवपुरी चौकात के दार कुटुंब वास्तव्यास असून, या कुटुंबाची सून सिंधूबाई केदार (४०) नेहमीप्रमाणे सकाळी गच्चीवर कपडे वाळत टाकत होत्या. त्यावेळी त्यांची सासू सोजाबाई (७५) या जवळच एका पलंगावर बसलेल्या होत्या. अचानकपणे सिंधूबाई यांना गच्चीजवळून जाणाºया वीजवाहिन्यांच्या वीजप्रवाहचा जोरदार धक्का लागल्याने गच्चीवर कोसळल्या. सोजाबाई यांनी सुनेच्या मदतीला धाव घेतली मात्र वीजप्रवाहचा त्यांनाही धक्का बसल्याने त्याही जागीच गतप्राण झाल्या. आई व आजीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने दोघा भावंडांनी गच्चीवर धाव घेतली. दरम्यान, त्यांचाही वीजप्रवाहाशी संपर्क झाला. त्यामुळे नंदिनी (२३) व शुभम (१९) हे भाऊ-बहीण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सायंकाळपर्यंत कुटुंबीयांनी सासू-सुनेचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.केदार कुटुंबीय हातावरचे असून, कुटुंबाचा कर्ते पुरुष शांताराम के दार हे सेंट्रिगची कामे करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवितात. शांताराम हे नेहमीप्रमाणे रविवारी घरातून डबा घेऊन सेंट्रिंगच्या कामावर जाण्यासाठी निघाले. तोच अशी दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरुद्ध तीव्र संतापाची लाट पसरली. नागरिकांनी परिसरातील चौकात एकत्र येत महावितरणच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. केदार कुटुंबीयांना न्याय द्यावा आणि सिडकोत लोंबकळणाºया वीजतारांची टांगती तलवार काढून घ्यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. दरम्यान, मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नागरिक व कुटुंबीयांची रुग्णालयाच्या आवारात गर्दी झाली होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविण्याची मागणी यावेळी नागरिकांनी लावून धरली. काही वेळेतच महावितरण कंपनीचे नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण बरोली, सहायक अभियंता मोरे, कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी धाव घेतली.यावेळी बरोली यांनी परोपकारी यांना नुकसानभरपाई व अर्थसहाय्य आणि जखमींच्या औषधोपचाराचा खर्च महावितरणकडून केला जाणार असल्याचे लेखी हमीपत्र दिले. तसेच दोन लोकप्रतिनिधींनीही या कुटुंबाला प्रत्येकी ५० हजारांची मदत दिली.‘त्यांनी’ दाखविले प्रसंगावधानकेदार कुटुंबीयांचा ओरडण्याचा आवाज आणि विद्युत तारांवर होणारे स्पार्किंग लक्षात घेत परिसरातील जागरूक युवक भूषण राणे, नीलेश तसकर, संजय भामरे आदींनी वीजवाहिन्यांच्या मुख्य खांबाजवळ धाव घेत ‘खटका’ ताकदीने खाली ओढला. यामुळे तत्काळ ११केव्हीच्या वीजवाहिन्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला. या युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे नंदिनी व शुभम या भावंडांचे प्राण वाचू शकले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.४केदार कुुटुंबातील दोघा महिलांचा झालेला मृत्यू आणि गंभीर जखमी झालेले भाऊ-बहीण यांच्याविषयी उत्तमनगर, शिवपुरी चौकासह संपूर्ण सिडकोमधून हळहळ व्यक्त होत आहे.‘११ केव्ही’च्या वीजवाहिन्याअतिउच्चदाबाच्या सुमारे ११ के व्हीच्या वीजवाहिन्या शिवपुरी चौकातून विद्युत खांबांवरून जातात. या वीजवाहिन्यांचे खांब नागरिकांच्या घरांपासून अगदी काही फुटांवर आहे. पावसाळ्यात वीजवाहिन्यांवर अनेकदा ‘स्पार्क’ होऊन ठिणग्याही उडण्याच्या घटना घडल्या आहेत. केदार कुटुंबीयांच्या घरापासून काही अंतरावर वीजवाहिन्यांचा खांब आहे.‘महावितरण’ देणार मदतीचा हातशिवपुरी चौकात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिकांचा जमाव घटनास्थळी जमला. यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी पोलिसांसह दाखल झाले.
सासू-सुनेच्या मृत्यूनंतर नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:59 AM