नाशिक (सुयोग जोशी) : कोरोनाच्या नवीन जे वन व्हेरिंटच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या गर्दीत अगर कार्यक्रमात जाणे नागरिकांनी टाळावे असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये न्यू व्हेरिंटच्या करण्यात आलेल्या १११ अँटिजन चाचण्या निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गुरूवारी तब्बल ७२ चाचण्या वेगवेगळ्या रूग्णालयांमध्ये करण्यात आल्या तर तत्पूर्वी ३९ चाचण्या करण्यात आल्या हेत्या. बुधवारी जेडीसी बिटको रूग्णालयात १२, स्वामी समर्थ रूग्णालयात १ तर सिडकोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली १ अशी १४ टेस्ट निगेटिव्ह आल्या. तत्पूर्वी मंगळवार सायंकाळपर्यंत २५ टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिटको रुग्णालयात अँटीजन तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही विशेष खबरदारी म्हणून तयारीला सुरूवात केली असून सुमारे ४०० बेडसह ऑक्सीजन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महापालिकेचे बिटको व डॉ. जाकीर हुसैन रुग्णालय मिळून एकुण चारशे बेड सज्ज ठेवण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांध्ये जाणे नागरिकांनी टाळावे. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना दुर्धर आजार आहेत त्यांना या न्यू व्हेरिएंटचा धोका आहे. त्यामुळे त्यांनीही याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी घाबरू नये, सतर्कता बाळगावी. मनपाच्यावतीने सर्व रूग्णालयांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरेसे ऑक्सीजन साठ्यासह जंबो सिलिंडरही उपलब्ध आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आहेत. सध्या हिवाळा असल्याने थंड पदार्थ टाळावे.
-डॉ. तानाजी चव्हाण, आरोग्य अधिकारी, मनपा