नाशिक : अशोकामार्ग पखालरोड परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या असून, त्याला प्रतिबंध बसावा म्हणून आम्ही दररोज सायंकाळी सात ते दहापर्यंत पेट्रोलिंग करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांना व्यवस्थित पार पाडता यावी म्हणून पोलिसांनी ‘जनजागृती मोहीम’ हाती घेतली आहे.या मोहिमेत रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी केले. पखाल रोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर नगरसेवक सतीश कुलकर्णी, नगरसेविका रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, सुप्रिया खोडे, कार्यकर्ते यशवंत निकुळे, मिर्झा सलीम बेग, सुनील प. खोडे, समता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम ठाकूर, उपाध्यक्ष डी. एफ. मोरे, सचिव दीनानाथ पाटील उपस्थित होते. यावेळी बळवंत शिर्के, शांताराम पोळे, चिंतामण आहेर, रा. शि. दोंदे, व्ही. के. ठाकूर, पी. बी. कासुदे आदी उपस्थित होते.संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम ठाकूर यांनी स्वागत केले. नंतर प्रभाग २३ मधील नागरी सुविधा उपलब्ध होणेसाठी तसेच सुरक्षा, वाहतूक यांसंदर्भात अशी दोन निवेदने महापालिका व पोलीस खात्याकडे संबंधितांना सुपूर्द केली. संघाचे सचिव दीनानाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले.
नागरिकांनी सुरक्षेची स्वत:च काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:53 AM