----------------
सिन्नरला कर्मचाऱ्यांची तपासणी
सिन्नर : येथील नगर परिषद कार्यालयात महिला व स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. नेत्रतज्ज्ञ दिनेश डोंगरे व क्रांती डोंगरे यांनी महिला व स्वच्छता कर्मचाऱ्यांची तपासणी केली.
-----------------
सिन्नरला चारशे चाचण्यांचे लक्ष
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याने आरोग्य विभागाने दररोज चारशे चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर ही मोहीम राबवली जात आहे.
------------------
जायगावला पदाधिकाऱ्यांचा सत्कार
नायगाव : तालुक्यातील जायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सॅनिटायझर, मास्क व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व वृत्तपत्र वितरक दत्तात्रय गोसावी यांनी हा गौरव केला.
-----------------
बारागावपिंप्रीत कोरोनाबाबत जनजागृती
सिन्नर : कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी तालुक्यातील बारागावपिंप्री येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्यावतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
-----------------
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव व कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने नगर परिषद व पोलीस प्रशासनाने याची दखल घेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.