ओझरसह परिसरातील नागरिक कोरोना विषाणू संसर्गामुळे गेले दीड वर्ष भयग्रस्त होते, ते भय आता कमी झाले असतानाच गेल्या दोन महिन्यापासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने साथीच्या आजाराचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया आदी आजाराचा प्रसार होऊन सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
चौकट...
औषध फवारणी आवश्यक
डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत म्हणून ओझरसह परिसरात सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन फॉगिंग मशीनच्या साह्याने ओझरसह सर्व नगरात औषधाची धूर फवारणी करून डास निर्मूलन योजना राबवावी तसेच वाढलेल्या काँग्रेस गवताची कापणी करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने दीपक पाटील यांनी कार्यालयात दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.