ओझर : कोरोनाच्या संकट काळात मालेगाव येथे तब्बल २ महिने कर्तव्य बजावणाºया ओझर पोलीस कर्मचाºयांचे ओझर पोलीस ठाणे येथे नागरिकांतर्फेजंगी स्वागत करण्यात आले.शब्ब-ए-बारात, रमजान ईद व कोरोनाच्या संकट काळात मालेगाव येथे कर्तव्य बजावलेल्या आठ पोलीस कर्मचाºयांमध्ये अनुपम जाधव, अमोल सूर्यवंशी, एकनाथ हळदे, विनोद वाघेरे, चंदू लहांगे, विशाल लहाणे, स्वप्निल जाधव, विजय गायकवाड यांचा समावेश होता. या सर्व कर्मचाºयांना उमराळे (ता. दिंडोरी) येथे १४ दिवस कॉरन्टाईन करण्यात आले होते. याच कालावधीत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी कर्मचाºयांना आरोग्याबाबत औषधोपचाराबाबतीत विशेष काळजी करत लक्ष दिले.सुरु वातीस एच. ए. एल. प्रवेशद्वारा समोरून पोलीस कर्मचाºयांना हार घालून उघड्या जीप मधून पोलीस ठाण्यापर्यंत आणण्यात आले. इतर पोलीस कर्मचाºयांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी केली व महिला कर्मचाºयांनी सर्वाना औक्षण केले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे यांच्यासह जि. प. सदस्य यतीन कदम, शिवसेना निफाड उपतालुका प्रमुख प्रकाश महाले, निफाड तालुका भाजपा तालुका अध्यक्ष भागवत बोरस्ते, सुखदेव चौरे, केंद्रीय दिशा समिती सदस्य दिपक श्रीखंडे, श्रीराम आढाव, किशोर कदम, ओझर शिवसेना शहरप्रमुख नितीन काळे, खलील सैय्यद, योगेश चौधरी, प्रशांत गोसावी, तेजमल बोरा, महेश ठाकरे, भुपेश वाघ, मोसीन पठाण, मुकुंद जाजू, भुषण मोरे, अथर्व आढाव यांनी देखील महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो, भारत माता की जय अशा घोषणा देत कर्मचाºयांचे स्वागत केले.
मालेगांव येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांतर्फेस्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 6:17 PM
ओझर : कोरोनाच्या संकट काळात मालेगाव येथे तब्बल २ महिने कर्तव्य बजावणाºया ओझर पोलीस कर्मचाºयांचे ओझर पोलीस ठाणे येथे नागरिकांतर्फेजंगी स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्दे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले